शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

औष्णिक विद्युतकेंद्र

कोळसा जाळून त्या उष्णतेपासून पाण्याच्या वाफेच्या साहाय्याने जनित्र फिरवून वीज निर्माण करणारे केंद्र.

औष्णिक विश्लेषण

(रसा.) उष्णता एकदम बाहेर टाकल्यामुळे किंवा शोषून घेतल्यामुळे मूलद्रव्याच्या घटकांत होणारा रासायनिक बदल.

औष्णिकगतिकीशास्त्र

न.

(भौ.) वस्तूच्या अस्तित्वाचे उष्णता आणि शक्ती यांच्याशी असलेले समीकरण मांडणारे शास्त्र. उदा. तपमान, दाब आणि कार्य यांचा परस्परांशी असलेल्या संबंधाचा वस्तूच्या कार्यावरील परिणाम.

औसत

वि.

मधील; सरासरी. [फा.]

औसा

पु.

तात्पुरती झोपडी : ‘कलिंगडे पिकायला लागल्यापासून मला साखरपट्टीत औसा घालून राहणे भाग पडले होते.’ − आआशे ३४९. पुजारी. [सं. उप+आस्]

औसाफ

पु.

१. लौकिक; कीर्ती : ‘परशुरामपंत यांस छत्रपतींनीं मारविलें सबब विश्वासराव यास मारिले ही गोष्ट बेहिशेबाची, आमचे घराण्याचे औसाफास योग्य न जाले.’ − ऐलेसं ११·६१२५. २. गुण; लायकी. [फा.]

औसिकम

पु.

हरणाच्या रंगाचा घोडा. − अश्वप १·१०४.

औक्ष

न.

आयुष्य; जीवित; जीवनमर्यादा. [सं. आयुष्य]

औक्षण

न.

आरती ओवाळणे; आरती वगैरे ठेवलेले तबक किंवा लामणदिवा; लग्नकार्याच्या अथवा इतर शुभप्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्याचे मंगलकार्य असेल त्याला सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दीपादियुक्त ताम्हन. (सामा.) ओवाळणे. पहा : अक्षवाण : ‘त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडून औक

औक्षवण

औक्षवंत

वि.

चिरायू; चिरंजीव; आयुष्यमान; दीर्घायुषी; उदंड आयुष्याचा. (कुण. बायकी) [सं. आयुष्यवंत, आयुष्यवान्]

औक्षवान

वि.

चिरायू; चिरंजीव; आयुष्यमान; दीर्घायुषी; उदंड आयुष्याचा. (कुण. बायकी) [सं. आयुष्यवंत, आयुष्यवान्]

औंजार

पु.

उपद्व्याप. (गो.)

औंदा

क्रिवि.

यंदा; ह्या वर्षी; चालू साली : ‘औंदा सुटला पायजे सातवीतनं.’ − मिरास ५२. (कुण.) [फा. आयंदा]

औंध

स्त्री.

काळोखी; अंधारी. पहा : ओंध. [सं. अंध]

औंस

पु.

अडीच तोळे. १ औंस = २ जेवणाचे चमचे (टेबलस्पून). २. औंस = दारूचा एक पेला (वाइन ग्लास). [इं.] विभाग : ‘हे कठिण पांच औंस.’ − वह ६·२५. [सं. अंश]