शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकबरी मोहोर

स्त्री.

१. अकबराने सुरू केलेले पंधरा रुपये किंमतीचे सोन्याचे नाणे. २. या नाण्यांची केलेली माळ. ३. (ल.) इभ्रतदार (व्यापारी).

अकबार

वि.

चांगल्या बहरलेल्या; पूर्ण बहरलेल्या : ‘केतकी कर्दळी अकबार । बहु टवटवीत ।’ –पला ३·६.

अकरकी

स्त्री.

अकरे अकरे एकविसाशेपासून वीस वीसे चारशेपर्यंतचे पाढे.

अकरकी

क्रिवि.

अकरी; (सोंगट्यांच्या खेळात) अकराव्या घरात. [सं. एकादश]

अकरण

न.

कर्म न करणे; कर्मरहितता; निष्क्रियत्व; कर्मापासून मुक्तताः ‘तरी अकरणाचेनि खेदें ।’ – ज्ञा १८·५९२. [सं.]

अकरणरूप

न.

क्रियापदाचे नकारदर्शक रूप. उदा. नसणे; नाकारणे. २. नकारार्थक साहाय्यकारी क्रियापद करणरूपी क्रियापदाला जोडून तयार होणारे रूप. उदा. जात नाही, फसवे नसते, जाऊ नये. [सं.]

अकरण समायोजन

न.

ऋणसमायोजन.

अकरणात्मक (स्वातंत्र्य)

न.

(राज्य.) १. नकारात्मक स्वातंत्र्य. २. केवळ बंधनाचा अभाव असलेले स्वातंत्र्य. ३. विधायक किंवा वास्तव आशय, अर्थ नसलेले स्वातंत्र्य. [सं.]

अकरणी अंक

पु. (ग.)

ज्याचा अंश पूर्णांक आहे व छेद शून्येतर पूर्णांक आहे अशा अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिता येणारा अंक. [सं.]

अकरणीय

वि.

करण्यास अयोग्य, अनुचित : ‘परिकरणीया अकरणीया न देखा ।’ – ऋ ४५. [सं.]

अकरणे, प्रत्यवाय

पु.

जे केले नाही तर ते चुकीचे ठरेल असे; जे न करणे लाजिरवाणे ठरेल असे; बंधनकारक. [सं.]

अकरताळ

वि.

हट्टी; माथेफिरू; कजाग; खोडकर; दांडगा (विशेषतः मुले व स्त्रिया यांच्याबाबतीत). [सं. अकृत+लु]

अकरताळ्या

वि.

हट्टी; माथेफिरू; कजाग; खोडकर; दांडगा (विशेषतः मुले व स्त्रिया यांच्याबाबतीत). [सं. अकृत+लु]

अकरनकर

वि.

जे करायला हवे ते न करणारा आणि करायला नको ते करणारा; करनकरा; स्वेच्छाचारी.

अकरम

वि.

१. हीन मानलेल्या जातीचा; हीन वृत्तीचा. २. लबाड; धूर्त; कपटी. [सं. अकर्म] कृपावंत [अर. अक्राम]

अकरमाश्या

वि.

१. (बारा माशांचा तोळा. त्यात एक मासा हीण, म्हणून अकरामाशा म्हणजे हीन प्रतीचा. त्यावरून) अनौरस; दासीपुत्र; जारज; हीन बीजाचा; कमजात. २. (ल.) कृतघ्न. ३. (क्वचित) अकरा मासे वजनाचा (तोळा, रुपया इ.).

अकरमाश्या

पु.

१. अकरा महिने गर्भाशयात राहून जन्मलेले मूल. २. अकरा महिने पोटात गर्भ बाळगणारा प्राणी (म्हैस).

अकरमास

पु.

वर्षश्राद्ध. (व.)

अकरमाही

स्त्री.

अकरा महिन्यांचा पगार देऊन वर्षभर चाकरी करून घेणे; इंग्रज अमलापूर्वी भारतात बहुतेक ठिकाणी ही पद्धत चालू होती.

अकरवातोत्तर

वि.

करमुक्त : ‘अकरवातोत्तरे भूमी १०० दाउपसाउ वाहिला’ – पळस शिला १·२.