शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकरा

वि.

न करणारा; आळशी; हट्टी. दहा अधिक एक मिळून होणारी संख्या; ११ ही संख्या. [सं. एकादश]

अकरावा

वि.

क्रमाने १० नंतरचा.

अकरावा

पु.

१. माणूस मेल्यानंतर तो दिवस घरून त्याच्या अकराव्या दिवशी करावयाचा वृषोत्सर्गादी विधी.

अकरावा गुरु, अकरावा गुरू

१. भाग्योदय होणे : ‘मामलेदार, लष्करी लोक, सावकार, पाटील–कुलकर्णी, देशमुख–देशपांड्ये यांना मात्र अकरावा आला.’ – गांगा ४७. २. गुरू हा ग्रह जन्मलग्नाच्या अकराव्या घरात आल्यास अत्यंत अनुकूल समजला जातो. त्यावरून दाट मैत्रीचे निदर्शक.

अकरावा रुद्र

१. शंकराचा अकरावा अवतार. २. हनुमान; मारुती. ३. (ल.) अति रागीट, तापट माणूस. (अकराही रुद्र अति भयंकर असतात; पण त्यातल्या त्यात अकरावा सर्वांहून भयंकर आहे, अशा समजुतीवरून).

अकराळविकराळ

वि.

प्रचंड; भयंकर; भयानक; भीतिदायक; उग्र; ज्याची भीती वाटेल असा. [सं. करालचे द्वि.]

अकरी

अ.

सोंगट्याच्या पटावरील विवक्षित घरापासून अकराव्या घरी. बुद्धिबळाच्या खेळातील एक संज्ञा.

अकरुण

वि.

निर्दय; निष्ठुर; क्रूर; कठोर. [सं.]

अकरे

न. अव.

१. (देवापुढे लावण्याच्या) अकरा वातींचा समूह. २. आज एक, उद्या दोन, परवा तीन अशी चढत्या क्रमाने अकरा दिवस देवापुढे पिठाचे दिवे ठेवणे व परत एकपर्यंत उतरत्या क्रमाने कमी करणे. ३. चातुर्मास्यात चार चार बोटे लांबीच्या अकरा वाती निरांजनात पेटवून ओवाळण्याचा मुलीं

अकर्तव्य

वि.

१. जे करणे उचित नाही ते; करावयाला योग्य नव्हे ते. २. जे करावयाचे योजलेले नाही ते. [सं.]

अकर्ता

वि.

१. एखादी गोष्ट करण्यास अपात्र, अयोग्य. २. काहीच कर्तव्य कर्म न उरलेला; सिद्ध : ‘जे अकर्त्याच्या ठायी बैसो येती ।’ –ज्ञा १३.२८१. ३. काही न करणारा (आळशी); सुस्त. [सं.]

अकर्तात्मबोध

पु.

देहीच विदेहता प्राप्त होणे; देहभान नसणे; प्रपंच, व्यवसाय करीत असताना ‘स्व’ चे अवधान न राहणे.

अकर्तृक

वि.

१. (व्या.) ज्या क्रियापदाचा कर्ता स्वतंत्रपणे वाक्यात दिलेला नसून त्या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ म्हणजे भाव हाच त्याचा कर्ता मानावा लागतो, असे क्रियापद. अशा वेळी कर्ता हा क्रियापदातच सामावलेला असतो. २. स्वयंभू; जे कोणीही केलेले नाही असे. [सं.]

अकर्तृत्त्व

न.

कर्तृत्त्व नसणे; कर्तबगारी नसणे; नालायकी; कार्यक्षमता नसणे; पुरुषत्व नसणे. [सं.]

अकर्म

न.

१. दुष्कर्म; कुकर्म; वार्इट काम; पापकृत्य; नीतिबाह्य, निषिद्ध कर्म; अयोग्य कृत्य : ‘तंव तंव होती थोराडें । अकर्माचीं तळबुडें ॥’ –ज्ञा १५.१६८.२. ज्यास कर्म नाही असे; कर्मातीत (कर्माच्या पलीकडचे) ब्रह्म : ‘जें कर्मावेगळे सर्वांगें । जेथ लावितांहि न लगे । जे

अकर्मक

वि.

(व्या.)कर्म नसलेले किंवा कर्माची गरज नसलेले (क्रियापद). [सं.]

अकर्मगति

स्त्री.

पापमार्ग; वार्इट मार्गः ‘तरि कैसी करुं अकर्मगति । स्वामिद्रुही होऊनि ॥’ – क्रिपु १२·२२. [सं.]

अकर्मण्यता

स्त्री.

निरुद्योग; काम न करणे; आळशीपणा; कामाबद्दल उदासीनता; नकर्तेपणा. [सं.]

अकर्मा

वि.

१. कर्महीन; कर्मातीत; कर्मरहित; ज्याला कर्माची बाधा नाही असा : “मी अकर्मा न करोनि करीं कर्मे ।’ – एभा २·२९८.२. साहसकर्म करणारा. [सं.]

अकर्माकार

वि.

वार्इट, पाप, अघोरी साहस करणारा : ‘अंबालयीं यादव वीर । उतरले आहेती अकर्माकार ॥’ – एरुस्व ६·४१. [सं.]