शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
सर्व
शब्द समानार्थी व्याख्या

अकर्मी

वि.

१. दुष्ट; गुन्हेगार; पाप (अकर्म) करणारा. २. दुर्दैवी; कमनशिबी. [सं.]

अकल

वि.

कला नसलेला; चढउतार नसलेला; अंश, भाग नसलेला; अक्षय : ‘जयजय अकलकलाशून्य ।’ – रंयो १·९. [सं.]

अकलकरा

पहा : अक्कलकारा

अकलकडा

पहा : अक्कलकारा

अकलकाडा

पहा : अक्कलकारा

अकलकाढा

पहा : अक्कलकारा

अकलकारा

पहा : अक्कलकारा

अकलंक

वि.

निष्पाप; निर्दोष.

अकलंकी

वि.

निर्मल; निर्दोष; ज्याच्यावर कोणताही डाग नाही असे; ‘गोरट्या अकलंकी वृत्तीचे …’ – पासंग ३२.

अकला

पु.

घोड्याला होणारा रोग. हा रोग झाल्यास घोडा लंगडतो.

अकलाद

वि.

पहा : अल्लाद

अकलुषित

वि.

खरे; स्वच्छ; प्रामाणिक; दूषित नसलेले : ‘त्यामुळे पत्रलेखकांचे खरे व अकलुषीत मत प्रतिबिंबित होत नाही.’ – विराशिंरो १६. [सं.]

अकल्पन

वि.

१. कल्पनारहित; निरिच्छ; कल्पनेच्या पलीकडील : ‘अकल्पनाख्यकल्पतरो ।’ – ज्ञा. १८·१०. [सं.]

अकल्पनीय

वि.

ज्याची कल्पना करणे शक्य नाही असे; अतर्क्य; न सुचणारे; कल्पनातीत. [सं.]

अकल्पित

वि.

१. ज्याची कल्पना होणार नाही असे. २. ज्याविषयी पूर्वी काही बेत, योजना, तयारी, विचार केलेला नाही असे. ३. अनुद्दिष्ट; अचिंतित; अकस्मात; अतर्कित; विचारात किंवा तर्कात नसलेले; ज्याची पूर्वी सूचना मिळालेली नाही असे. [सं.]

अकल्मष

वि.

१. निष्पाप; निर्दोष. २. स्वच्छ; निर्मल. ३. पूर्वग्रहाने दूषित नसलेले. [सं.]

अकल्याण

न.

अमंगल; अशुभ; अहित; नुकसान.

अकल्याण

वि.

वार्इट; अमंगल; हानिकारक. [सं.]

अकल्याणकारी

वि.

हित न करणारा; नुकसान करणारा; अहितकारक; अनर्थकारी. [सं.]

अकवि, अकवी

वि.

१. मूर्ख; अज्ञानी. २. कवी नसलेला. [सं.]