मुख्य पृष्ठ >>गौरववृत्ती

महाराष्‍ट्रातील ज्‍येष्‍ठ साहित्यिक व कलावंताचा सन्‍मान करण्‍याच्‍या दृष्‍टीने मंडळातर्फे दरवर्षी दोन मान्‍यवरांना गौरववृत्‍ती प्रदान करण्‍यात येते. रु. ५०,०००/- रोख, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या गौरववृत्‍तीचे स्‍वरुप असते.

यातील एक गौरववृत्‍ती ज्‍येष्‍ठ सा‍हित्यिकास तर दुसरी साहित्यिकेतर कलावंतास देण्‍याचे मंडळाचे धोरण आहे. ‘सन २०१२-२०१३ या वर्षातील गौरववृत्ती ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ, औरंगाबाद यांना व ज्येष्ठ कलावंत श्री. वसंत अवसरीकर यांना देण्यात आली. षयवी।

'साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मंडळाकडून गौरववृत्ती योजनेअंतर्गत कला व साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तींना देण्यात येणारी गौरववृत्ती या दोन्ही योजना एकाच स्वरूपाच्या असल्यामुळे गौरववृत्ती योजना पुरस-1012/प्र.क्र.111/2012/भाषा-3, दिनांक 03 मार्च, 2014 अन्वये बंद करण्यात आली आहे.’

अ.क्र. वर्षे साहित्यिक/कलावंत
१) १९८१-१९८२ श्री.माधवराव बागल, कोल्‍हापूर
श्री.नारायण सुर्वे, मुंबई
२) १९८२-१९८३ श्री. बाबुराव बागुल, नाशिक
डॉ.रा.चिं.ढेरे, पुणे
३) १९८३-१९८४ डॉ.वि.भि.कोलते, नागपूर
डॉ.सरोजिनी बाबर, पुणे
४) १९८४-१९८५ श्री.पु.य.देशपांडे, बुलढाणा
श्रीमती आनंदीबाई शिर्के
५) १९८६-१९८७
१९८७-१९८८
श्री.ना.घ.देशपांडे, बुलढाणा
पं.महादेवशास्‍त्री जोशी, पुणे
६) १९८८-१९८९ श्री.वि.वा.शिरवाडकर, नाशिक
श्री.सेतु माधवराव पगडी, मुंबई
७) १९८९-१९९० श्री.रा.ना.चव्‍हाण, वाई
श्री.वा.रा.कांत, मुंबई
८) १९९०-१९९१ श्री.उत्तमराव मोहिते,अमरावती
श्री.वामन कर्डक, नाशिक
९) १९९१-१९९२ श्री.यदुनाथ थत्ते, पुणे
आचार्य दीनबंधू शेगावकर,अकोला
१०) १९९२-१९९३ श्री.देवीसिंग चौहान, लातूर
शाहीर विश्‍वासराव फाटे
११) १९९३-१९९४ श्री.प्रभाकर ऊर्फ भाऊ पाध्‍ये,वसई
शाहीर आत्‍माराम पाटील, मुंबई
१२) १९९४-१९९५ श्रीमती वसुंधरा पटवर्धन, पुणे
श्री.राम नगरकर, पुणे
१३) १९९५-१९९६ श्री.वि.श्री.जोशी, मुंबई
श्री.स.मा.गर्गे, पुणे
१४) १९९६-१९९७ डॉ.भा.पं.बहिरट, पंढरपूर
श्रीमती इंदिरा संत, बेळगाव
डॉ.श्री.रं.कुलकर्णी, हैदराबाद
श्री.ज.शं.वाटाणे, नवी दिल्‍ली
१५) १९९७-१९९८ श्रीमती मालतीबाई बेडेकर,पुणे
डॉ.म.न.जोशी, पुणे
१६) १९९८-१९९९ श्री.गोपीनाथ तळवळकर, पुणे
म.म.यज्ञेश्‍वरशास्‍त्री कस्‍तुरे,नांदेड
१७) १९९९-२००० डॉ.यू.म.पठाण, औरंगाबाद
श्रीमती नलिनी पंडित, मुंबई
१८) २०००-२००१ श्री.शंकरराव खरात, पुणे
श्री.शिवाजी सावंत, पुणे
१९) २००१-२००२ श्रीमती शांता शेळके, पुणे पद्मश्री
श्री.शंकर बापू आपेगांवकर, औरंगाबाद
२०) २००२-२००३ शाहीर साबळे, मुंबई
डॉ.गंगाधर पानतावणे, औरंगाबाद
२१) २००३-२००४ श्री.पुरुषोत्तम पाटील, धुळे
डॉ.गुलाम रसूल, परभणी
२२) २००४-२००५ श्री.रामचंद्र गोपाळ शेलार, पुणे(ह.भ.प.शेलारमामा)
श्री.माणिक गोडघाटे, नागपूर(कवी ग्रेस)
२३) २००५-२००६ मंडळाची पुनर्रचना झाली नसल्‍यामुळे त्‍यावर्षी गौरववृत्ती देण्‍यात आली नाही.
२४) २००६-२००७ १) श्री.विठ्ठल उमप
२) डॉ.म.सु. पाटील
२५) २००७-२००८ १) श्री.वि.पां.देऊळगावकर, गुलबर्गा
२) गुरु पार्वतीकुमार, मुंबई
२६) २००८-२००९ १) डॉ.स.रा.गाडगीळ, औरंगाबाद
२) ज्‍येष्‍ठ शाहीरा सौ.अनुसयाबाई शिंदे, कळमनुरी
२७) २००९-२०१०

१) प्रा.म.द.हातकणंगलेकर, सांगली
२) श्रीमती यमुनाबाई वाईकर, वाई


२८) २०१०-२०११

१) श्री. भालचंद्र नेमाडे,  मुंबई

२) श्री. लीलाधर हेगडे
२९) २०११-२०१२ १) श्री. वसंत पळशीकर, नाशिक
२) श्री नवलादेवी नमन मंडळ, रत्नागिरी
३०) २०१२-२०१३ १) डॉ. सुधीर रसाळ, औरंगाबाद
२) श्री. वसंत अवसरीकर, पुणे
मंडळाची माहिती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाजालकावरील संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती यांची जोपासना करण्याच्या कामी १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यरत आहे.